नागपंचमीनिमित्त सर्परेस्क्यूसाठी अत्याधुनिक उपकरणांची भेट;
पुणे, दि. १८ ऑगस्ट २०२६ : नागपंचमीच्या पावन पर्वानिमित्त सर्वात्मक महारुद्र परिवार ट्रस्टच्या वतीने गुरुवर्य श्री. प्रकाशभाऊ शिंदे यांच्या पुढाकारातून राजीव गांधी प्राणीसंग्रहालयास सापांच्या सुरक्षित रेस्क्यूसाठी आवश्यक असलेली अत्याधुनिक आणि परदेशातून आयात केलेली उपकरणे सप्रेम भेट देण्यात आली.
सापांचे सुरक्षित रेस्क्यू, त्यांचे संरक्षण आणि मानव–वन्यजीव संघर्ष कमी करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. सर्पमित्र तसेच प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांना साप हाताळताना अधिक सुरक्षितता मिळावी आणि सापांना कोणतीही इजा न होता त्यांचे सुरक्षित स्थलांतर करता यावे, यासाठी ही उपकरणे उपयुक्त ठरणार आहेत.
या प्रसंगी उपअधीक्षक सरडे मॅडम, संचालक राजकुमार जाधव, हेड ॲनिमल किपर कौशिक काशीकर, प्राणीमित्र बाळासाहेब ढमाले, डॉ. प्रवीण बढे, अथर्व भोसले, तेजस कराड, अथर्व बाणखेले आणि अजित कासकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
नागपंचमीच्या निमित्ताने केवळ धार्मिक परंपरेपुरते मर्यादित न राहता सर्पसंवर्धन, वन्यजीव संरक्षण आणि जनजागृतीला प्रत्यक्ष चालना देणारा हा उपक्रम ठरला. सर्वात्मक महारुद्र परिवार ट्रस्टच्या सामाजिक आणि पर्यावरणपूरक कार्याची दिशा अधोरेखित करणाऱ्या या उपक्रमाचे वन्यजीवप्रेमींमधून कौतुक होत आहे.
— सर्वात्मक महारुद्र परिवार ट्रस्ट
गुरुवर्य श्री. प्रकाशभाऊ शिंदे
(मठाधिपती)

