March 23, 2026

कोंढव्यातील संत गाडगे महाराज शाळेला अखेर दहावीपर्यंत मान्यता मिळाली

पुणे:कोंढव्यातील संत गाडगे महाराज शाळेला अखेर दहावीपर्यंत मान्यता मिळाली आहे.
यामुळे पहिली ते आठवीपर्यंत सुरू असलेली ही शाळा आता दहावीपर्यंत विद्यार्थ्यांना शिक्षण देणार आहे.

गेल्या काही महिन्यांपासून या मान्यतेसाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता.
संपत्ती विभाग, लेखा विभाग, शिक्षण विभाग, सर्वसाधारण विभाग, आयुक्त कार्यालय आणि नगर सचिवालय यांच्या समन्वयातून अखेर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
या प्रक्रियेत शिक्षण अधिकारी आशा उबाळे, सहाय्यक आयुक्त राजीव नांदुरकर, आशा राऊत, विजय थोरात तसेच अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज दिवटेbयांचे मोलाचे योगदान राहिले त्याचबरोबर नगर सचिव योगिता भोसले, RTI कार्यकर्ते विजय कुंभार
आणि निवृत्त DCP अशोक भारते यांचाही महत्त्वाचा पाठिंबा मिळाला.

नागरिक अधिकार मंचचे अध्यक्ष समीर शफी पठाण, आमदार योगेश टिळेकर, नगरसेविका राजश्री काळे, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज (इस्टेट)आणि अतिरिक्त आयुक्त प्रदीप चंद्रन (सामान्य) यांनीही पुढाकार घेतला.
तसेच राष्ट्रीय अल्पसंख्याक सदस्य **अली दारूवाला, इम्तियाज मोमीन, तौसिफ मुजावर, मोईन मडकी, आसिफ बागवान, निजाम खान, रौफ शेख, साजिद कुरेशी, हारून अन्सारी, दत्तात्रय कदम, ॲड. आदिबा तस्नीम, वसंत हराळे, मिलिंद सरोदे , महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना (प्राथमिक) पुणे आणि स्थानिक नागरिक यांच्या पाठिंब्यामुळे हा लढा यशस्वी ठरला.
या विजयाबद्दल कोंढवा रहिवाशांनी महमूद अली सय्यद यांचे विशेष आभार मानले.
हा फक्त एका शाळेचा विजय नाही, तर जनतेच्या हक्कांचा आणि सत्याच्या लढ्याचा विजय आहे.
मान्यता मिळाल्यानंतर महमूद अली सय्यद यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान केला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button