March 23, 2026

स्वातंत्र्य सैनिक नगरातील सभासदत्व प्रकरणावरून आई प्रतिष्ठानचा आक्रमक पवित्रा

पुणे:

“स्वातंत्र्य सैनिक नगरातील सभासदत्व प्रकरणावरून आई प्रतिष्ठानचा आक्रमक पवित्रा — ४ नोव्हेंबरपासून आमरण उपोषणाचा इशारा!”
“आई प्रतिष्ठानच्या वतीने स्वतंत्र सैनिक नगरात पायी मोर्चा — जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर!”
“स्वतंत्र सैनिकांच्या न्याय्य मागण्यांसाठी आई प्रतिष्ठानतर्फे आज स्वतंत्र सैनिक नगर, हनुमान टस्ट्र येथे पायी मोर्चा काढण्यात आला.”
या मोर्चाच्या माध्यमातून स्वतंत्र सैनिकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
पुण्यातील स्वातंत्र्य सैनिक नगरमधील सभासदत्वाच्या वादावरून आता आई प्रतिष्ठानने आक्रमक भूमिका घेतली आहे.
संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी पुणे — श्री जितेंद्र कुमार बुढी यांना दिलेल्या निवेदनात, सन २००६ पासून या भागात राहणाऱ्या स्वातंत्र्य सैनिक आणि गैर स्वातंत्र्य सैनिकांची यादी नियमित करण्याची मागणी करण्यात आली आहे.
आई प्रतिष्ठानने प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
तसेच,३१ डिसेंबर ही सभासदत्व वर्गीकरण आणि चलन भरण्याची शेवटची तारीख असल्याने हे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याची मागणीही केली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यावर अप्पर जिल्हाधिकारी सूनिल राऊत साहेबांनी प्रतिनिधींचे निवेदन स्वीकारले, तसेच 30 ऑक्टोबर रोजी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले.
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे, या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास ४ नोव्हेंबरपासून सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा आई प्रतिष्ठानने दिला आहे.
या मोर्च्याद्वारे स्वतंत्र सैनिकांच्या मागण्यांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button