“बोपोडी परिसरातील जेष्ठ नागरिक संघाचा रौप्य महोत्सवी वर्षाचा जल्लोष — मनोरंजन गीतांच्या माध्यमातून धडाकेबाज सुरुवात!”
“बोपोडी 2नोव्हेंबर:
जेष्ठ नागरिक संघाने आज आपले २५ वे वर्ष म्हणजेच रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करण्याची सुरुवात एक आगळ्यावेगळ्या ‘दिवाळी स्वर संध्येनं’ केली.
या कार्यक्रमात जेष्ठ कलाकार, समाजसेवक, तसेच मान्यवर पाहुण्यांची उपस्थिती लाभली.”
“कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते — ज्ञानेश्वर मुरकुटे,
तर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्षम नगरसेवक प्रकाशभाऊ ढोरे,
तसेच मान्यवरांमध्ये माजी नगरसेवक सनीदादा निम्हण,
जेष्ठ विधितज्ज्ञ ऍडव्होकेट रमेश पवळे*,
पुणे मनपा मुख्य समाज विकास अधिकारी *रामदासजी चव्हाण*,
समाजसेवक *संदीप कांबळे*,
समूहसंघटिका *ज्योतीताई भिंगारे* आणि स्वातीताई जाधव,
माजी अध्यक्ष प्रकाश मुरकुटे,
डॉक्टर पाटील, डॉक्टर जैन, कृष्णकुमारी धिमन,शांताबाई ढोरे, कमलताई गायकवाड, अख्तरी शेख आदी मान्यवर उपस्थित होते.”
“कार्यक्रमाची सुरुवात झाली जेष्ठ गायक अब्दूर बेगमपल्ली यांच्या सुरेल भजनाने — ‘सुख के सब साथी…’ आणि *‘विठ्ठल आवडी’ या भजनांनी संपूर्ण सभागृह भक्तिमय केलं.
यानंतर खडकी कलाकार कट्टा* अध्यक्ष सेल्व्हराज अंथोनी यांनी ‘*समा है सुहाना सुहाना’ या गीताने कार्यक्रमात रंगत आणली.
भजनी मंडळातील *सुखदेव गायकवाड* यांनी ‘शोधिसी मानवा…*’ हे भावगीत सादर केलं.”
“तर उमेश कांबळे यांनी ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे…’ हे मनाला भिडणारं मराठी गीत गाऊन प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
स्वाती जाधव आणि सहकलाकारांनी ‘चोरीचा मामला…’ हे युगल गीत सादर करून वातावरण रंगतदार केलं.
गणेश चोरगे यांनी ‘मुसाफिर हूं यारो…’,
तर दत्ता सूर्यवंशी यांनी ‘मनाच्या धुंदीत ये ना सखे ग साजणी…’ आणि ‘ओ मेरी शर्मिली…’ ही गीते सादर करून रसिकांची दाद मिळवली.”
“कार्यक्रमाचे प्रास्ताविक कालिदास जाधव यांनी केले,
सुत्रसंचालन दत्ता सूर्यवंशी यांनी केले,
तर आभार प्रदर्शन प्राध्यापक राजेंद्र मागाडे यांनी मानले.”
“हा सोहळा यशस्वी करण्यासाठी रत्ना बांगर,आशाताई बहिरट, के.पी. घागट, सुभाष गजरमल*, *सुरेश कांबळे*, *बबन दळवी*, *सुनील रकटे*, *चंद्रकांत मोरे* आणि सिद्दिक पठाण यांनी विशेष परिश्रम घेतले.”







“जेष्ठ नागरिकांच्या कलागुणांना आणि उत्साहाला सलाम करत,
बोपोडी जेष्ठ नागरिक संघाला रौप्य महोत्सवी वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!”
