March 23, 2026

आनंदी जीवन फाउंडेशनच्या वतीने 100 झाडांची वृक्षारोपण,

पुणे प्रतिनिधी शंकर जोग,

आनंदी जीवन फाउंडेशनच्या वतीने झाडे लावा झाडे जगवा संकल्प एक लक्ष एक लाख वृक्ष या संकल्पनेच्या अनुषंगाने कासुर्डी येथील मदत हॉस्पिटल व मदत वृद्धाश्रम येथे 100 विविध प्रकारे झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले यामध्ये चिकू आंबा जांभूळ लिंबू असे विविध प्रकारचे झाडे लावण्यात आले, या कार्यक्रमाचे आयोजन आनंदी जीवन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ मोहसीन पठाण यांनी केले,
यावेळी आनंदी जीवन फाउंडेशनचे सचिव आसिफ शेख, खजिनदार नूर मोहम्मद पठाण, तरन्नुम पठाण, सारिका भुजबळ, बजरंग राऊत, अण्णा चव्हाण, भरत सुरवसे, साहिल पठाण, आबा सोनवणे, काळूराम शेंडगे, शबनम शेख, दौलत ठोंबरे, संतोष आखाडे, मयूर आखाडे, ऋषिकेश राजवाडे, आदि यावेळी उपस्थित होते,
यावेळी आनंदी जीवन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ मोहसीन पठाण यांनी सांगितले फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी विविध सामाजिक उपयोगी कार्यक्रम घेण्यात येतो मोफत रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, नेत्र तपासणी शिबिर, चष्मे वाटप, तसेच महिलांसाठी सुपर होम मिनिस्टर खेळ पैठणीचा, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, तसेच गोरगरिबांना अन्नदानाचा कार्यक्रम घेण्यात येतो असे डॉ, मोहसीन पठाण यांनी सांगितले,

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button