जितेंद्र आव्हाड युवा मंच अमरावती विभाग अध्यक्षपदी सुधीर भगत यांची निवड
17 डिसेंबर:महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट गृहनिर्माण मंत्री तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार जितेंद्र आव्हाड युवा मंचच्या अमरावती विभाग अध्यक्षपदी सुधीर भगत यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे अधिकृत पत्र महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रमोद सरोदे यांच्या हस्ते सुधीर भगत यांना देण्यात आले.
या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना सुधीर भगत यांनी सांगितले की, जितेंद्र आव्हाड साहेबांच्या नेतृत्वाखाली गोरगरीब, सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रामाणिकपणे काम करत राहू. युवकांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, सामाजिक न्यायासाठी संघर्ष करणे आणि संघटना अधिक बळकट करणे हे आपले प्रमुख उद्दिष्ट राहील, असेही त्यांनी नमूद केले.
त्यांच्या निवडीबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून अमरावती विभागात युवक संघटनेचे कार्य अधिक प्रभावी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.


