काँग्रेस पक्षाच्या वतीने मेहतर वाल्मीकी समाजाला उमेदवारी द्यावी, पुणे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्याकडे मागणी,
पुणे प्रतिनिधी शंकर जोग,
काँग्रेस पक्षाच्या वतीने मेहतर वाल्मीकी समाजाला उमेदवारी द्यावी, पुणे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्याकडे मागणी,
पुणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये पुणे शहरातून मेहतर वाल्मिकी समाजाला पुणे शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय मजदूर काँग्रेसच्या वतीने पुणे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली, मेहतर वाल्मिकी समाज रूढी परंपरागत काँग्रेस पक्षाच्या नेहमी सोबत राहिलेला आहे, महाराष्ट्रातून समाजाच्या अनेक कार्यकर्त्यांना काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली होती, परंतु 2017 साली पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाकडून समाजाला एकही प्रभागातून प्रतिनिधित्व देण्यात आलेले नाही, या निवडणुकीमध्ये पुणे शहरातून विविध ठिकाणी मेहतर वाल्मिकी समाजाचा प्रभाव असून निवडून येण्याची क्षमता आहे, तरी काँग्रेस पक्षाने विचार करून समाजाला न्याय द्यावा,
यावेळी अखिल भारतीय मजदूर काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष डॉ अनुपम बेगी, विनोद निनारिया, शितल दयाल, अनिल रमेश डींगीया, कविराज संघेलिया, दीपक निनारिया (अध्यक्ष पुणे शहर सफाई कामगार सेल) प्रमोद निना रिया, राजपाल घलोत, चंद्रकांत चव्हाण, विश्वास चव्हाण पंचप्रमुख ससून पंचायत, जीवन दयाल,
(अध्यक्ष भारतीय वाल्मिकी समाज,) भुलेश्वर चव्हाण, आदि यावेळी उपस्थित होते,

