सुभद्रा सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने अंध, आणि निराधार परिवारांना शिधा वाटप, आधार कार्ड आणि रेशन कार्ड वाटप
पुणे प्रतिनिधी शंकर जोग, दिनांक 29 डिसेंबर
सुभद्रा सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने अंध, आणि निराधार परिवारांना शिधा वाटप, आधार कार्ड आणि रेशन कार्ड वाटप,
सुभद्रा सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष विलास लोंढे यांच्या मार्गदर्शनाने हडपसर येथील अंध आणि निराधार परिवाराच्या सेवेच्या दुसरा टप्पा पूर्ण करण्यात आला हडपसर येथील टेकाम परिवाराचे घरातील तीन अंध व्यक्तींना यापूर्वी संस्थेच्या वतीने कायमस्वरूपीचे अपंगाचे दाखले विनामूल्य देण्यात आले, तसेच हजरत गौस पाक दर्गाह मंगळवार पेठ यांच्या वतीने (शिधा) राशन किट देण्यात आला होता, आज या परिवारातील मोंग्या टेकाम, टोणग्या टेकाम, चमकी टेकाम व कालीकर टेकाम यांना अपडेटेड स्मार्ट आधार कार्ड देण्यात आले, व मोफत धान्य किट देण्यात आले तसेच या परिवारास नवीन रेशनिंग कार्ड देण्या करिता संस्थेच्या वतीने काम सुरू करण्यात आले, या कामात करिता संस्थेचे संचालक नितीन बालकी, इरफान सय्यद नाथाभाऊ दुबळे विकास भोपळे यांनी रेशन कार्ड साठी कागदपत्र काढून देण्याचे काम केले,
यावेळी रत्नाकर खोब्रागडे, विशाल अंदे, घनश्याम फुलपगार, प्रवीण फुलपगार, कलावती तूपसौंदर, प्रतिज्ञा पाटणे, अश्फाक शेख, आदि यावेळी उपस्थित होते,
