March 23, 2026

पुलगेट कॅम्प येथे अजित दादा पवार यांना सर्व पक्षीय शोकसभा भावनिक वातावरणात श्रद्धांजली,

पुणे प्रतिनिधी शंकर जोग,

01 फेब्रुवारी:पुलगेट लष्कर पोलीस चौकी समोरील भगवान श्री वीर गोगा देवजी मंदिर पटांगण कॅम्प पुणे येथे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजलीसाठी सर्वपक्षीय शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.
यावेळी भावनिक वातावरणात या शोकसभेत विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते नगरसेवक माजी आमदार. माजी मंत्री. तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते, या शोकसभेचे आयोजन राष्ट्रवादी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा अध्यक्ष नरेश जाधव यांनी केले.
यावेळी माजी राज्यमंत्री रमेश दादा बागवे, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, नगरसेवक निलेश अल्हाट, विवेक यादव, अविनाश बागवे. माजी नगरसेवक सदानंद शेट्टी, सुधीर जानजोत, संदीप लडकत, भीमराव पाटोळे, विक्रम पवळे. संदीप गाडे. राकेश कांबळे. महेंद्र लालबिगे. चंदन भोंडवाल. पुणे शहर मेहतर वाल्मिकी महासंघाचे अध्यक्ष रवी परदेशी, शैलेंद्र चव्हाण. मनू कागडा. तुषार पाटील. गणेश यादव. प्रशांत मते. गणेश नलावडे. अनिल दामजी. जावेद खान. अब्बास खान. आयाज शेख. शब्बीर शेख. संदीप भोसले. अनिकेत कोठावळे. आदि यावेळी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button