March 23, 2026

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप.

पुणे प्रतिनिधी शंकर जोग.

दिनांक: 10फेब्रुवारी

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शिक्षक संघाच्या वतीने गुरुवार पेठ येथील सेंट हिल्डाज मुलींची हायस्कूल मध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींना पॅड. पेन. आणि शालेय साहित्य वाटप शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य निवडणूक समन्वयक वैभव वाघ यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी वैभव वाघ म्हणाले विद्यार्थ्यांची शिक्षणाची जिद्द कायम ठेवण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाप्रती उत्साह वाढून त्यांना प्रेरणा मिळते अशा उपक्रमाला शिवसेना सदैव तुमच्या पाठीशी राहणार असल्याचे सांगितले. या उपक्रमाचे आयोजन शिवसेना शिक्षक संघाचे जिल्हाप्रमुख अनिल गडकरी सर आणि शिवसेना कसबा विधानसभा प्रमुख निलेश जगताप यांनी केले होते.
यावेळी प्रमुख पाहुणे शिवसेना शहर संघटक प्रकाश ढमढेरे. अनिल बटणे. वैद्यकीय पुणे शहर सल्लागार राजेंद्र बडदे. महिला आघाडी सह संपर्कप्रमुख नीता भोसले. विश्वास दिघे. अहमद खान. आदि यावेळी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button