उरुळी कांचन येथील साने संगीत क्लासेसचा गंधर्व परीक्षेत 98% दिमाखदार निकाल
उरुळी कांचन येथील साने संगीत क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडळ यांच्या गंधर्व संगीत परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत 98% निकालाची चमकदार कामगिरी नोंदवली आहे. डिसेंबर 2025 मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्राविण्य मिळवत क्लासेसचा गौरव वाढवला.
या यशानिमित्त साने संगीत क्लासेस, उरुळी कांचन येथे पारितोषिक वितरण व गुणगौरव समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ पत्रकार सहदेव खंडागळे यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प. डॉ. श्री. रविंद्र भोळे, कवी व इतिहास संशोधक खलील शेख, पत्रकार सुवर्णाताई कांचन, सोरतापवाडी गावाचे उद्योजक व पत्रकार बापूसाहेब चौधरी, अमोल भोसले आणि तुपे उपस्थित होते.
या यशामागे सर्व वाद्यांमध्ये पारंगत असलेले आणि विद्यार्थ्यांना सातत्याने मार्गदर्शन करणारे श्री. शिवराज साने सर यांचे मोलाचे योगदान आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली क्लासेसमध्ये वार्षिक सहल, स्नेहसंमेलन, आकाशवाणी व दूरदर्शनवरील विद्यार्थी सहभाग, समाजप्रबोधन, जनजागृती पथनाट्ये अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते.

या समारंभाला संस्कृती अंधारे, वैष्णवी साळुंखे, रणक खरात, वेदांत गायकवाड, संकेत खंडागळे, श्रेयस गायकवाड, रुद्र जाधव, आरोही साळुंखे, यशराज साळुंखे, ऋतुजा आवळे, रियान गाडीलकर, सुयश घनवट, ओमकार कुंजीर, श्रेयस माने, समर्थ मुंडे आदी विद्यार्थ्यांसह मोठ्या संख्येने पालक व नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन शिवराज साने सर यांनी केले. सूत्रसंचालन रोहिदास बिचकुले यांनी तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ पत्रकार अमोल भोसले यांनी केले. साने संगीत क्लासेसच्या या उल्लेखनीय यशामुळे उरुळी कांचन परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
