March 23, 2026

द ज्वेल वन पेजेंट – मिस अँड मिसेस महाराष्ट्र 2026’ स्पर्धेच्या पुणे ऑडिशन्सची घोषणा

पुणे : स्मृती एंटरप्राईझेसच्या वतीने ‘द ज्वेल वन पेजेंट – मिस अँड मिसेस महाराष्ट्र 2026’ या भव्य राज्यस्तरीय सौंदर्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेच्या पुणे ऑडिशन्स 13 मार्च 2026 रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आज आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. या स्पर्धेच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातील महिलांना आपली प्रतिभा, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्व प्रभावीपणे सादर करण्याची संधी मिळणार आहे.

या पत्रकार परिषदेला स्मृती एंटरप्राईझेसच्या संचालिका स्मृती बोनगे, संचालक आधार शिंदे तसेच इवेंट पार्टनर सारिका तुळवे पाटील,अनिल व्यवहारे,ईशा यादव उपस्थित होते.

स्पर्धेच्या पुणे ऑडिशन्स 13 मार्च 2026 रोजी सदाशिव पेठ येथील सॅफ्रॉन बॅन्क्वेट्स येथे होणार असून यावेळी सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या स्पर्धेत 18 ते 55 वयोगटातील महिलांना सहभागी होता येणार असून नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. सहभागी महिलांसाठी विविध मार्गदर्शन, व्यक्तिमत्त्व विकास आणि करिअरच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

या स्पर्धेत विवाहित आणि अविवाहित महिलांसाठी स्वतंत्र गट ठेवण्यात आले असून अंतिम फेरीत विजेत्यांना एकूण 12 लाख रुपयांपर्यंतची बक्षिसे तसेच मनोरंजन, फॅशन आणि मॉडेलिंग क्षेत्रात पुढे जाण्याच्या विविध संधी मिळणार आहेत. महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये ऑडिशन्स आयोजित करण्यात येणार असून त्यातून निवड झालेल्या स्पर्धकांमध्ये ग्रँड फिनाले पार पडणार आहे.फिनाले मध्ये ज्या स्पर्धकांची निवड होईल अशा 40 स्पर्धकांना स्मृती एंटरप्राईझेस आणि पेंटेन स्टुडियोज प्रस्तुत ‘जयोस्तुते’ या म्यूजिक अल्बम मधे काम करण्याची संधी मिळणार आहे.

स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या महिलांनी +91 91676 73663, +91 91522 23663, +91 90961 50750 या क्रमांकांवर संपर्क साधून नोंदणी करावी किंवा www.thejewelonepageant.com
या संकेतस्थळावर नावनोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button