पुण्यात ‘मदर तेरेसा कप’ महिला फुटबॉल स्पर्धेचा जल्लोषात शुभारंभ; बेटी सुरक्षेला दिला क्रीडामय आधार
पुणे : सहयिनी सामाजिक विकास संस्थेच्या पुढाकारातून आणि ऑक्सिलियम कल्याण केंद्र पुणे तसेच सेल्सियन सहकारी येरवडा युनिटच्या सहकार्याने ‘बेटी सुरक्षा’ या महत्त्वपूर्ण उद्दिष्टासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘मदर तेरेसा कप’ POFA अंतर्गत महिला फुटबॉल स्पर्धेचा आज उत्साहात शुभारंभ झाला.
कोरेगाव पार्क येथील Don Bosco Youth Centre Ground येथे 21 ते 22 मार्च 2026 दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून Tanaya Chatterjee उपस्थित होत्या. त्या इमेजिंग टेक्नॉलॉजीज, स्निग्मे फाउंडेशन आणि स्निग्मे पुणे फुटबॉल क्लबच्या सह-संस्थापिका आहेत. त्यांच्या उपस्थितीने खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाला अतिथी म्हणून Pyarelal Chaudhary (उपाध्यक्ष, PDFA), Pradeep Pardeshi (सचिव, PDFA), Cyril Asirvadam (सहसचिव, PDFA), तसेच सिस्टर मनीषा परमार आणि सिस्टर मॅग्डेलिन सेक्वेरा उपस्थित होत्या.
या स्पर्धेचा मुख्य उद्देश म्हणजे महिला सक्षमीकरणाला चालना देणे आणि ‘बेटी सुरक्षा’ या विषयाबाबत समाजात जागरूकता निर्माण करणे हा आहे. फुटबॉलसारख्या क्रीडा माध्यमातून मुलींना आत्मविश्वास, शिस्त आणि संघभावना शिकवण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात येत आहे.
‘ध्रुवा’, पुणे आणि ‘४ एएनके’ यांच्या समर्थनाने आयोजित या स्पर्धेत अनेक महिला संघ सहभागी झाले असून, शहरात क्रीडा आणि सामाजिक संदेश यांचा सुंदर संगम पाहायला मिळत आहे.
या दोन दिवसीय स्पर्धेमुळे पुण्यात महिला फुटबॉलला नवे व्यासपीठ मिळणार असून, समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा संदेश दिला जात आहे. ⚽✨
