March 27, 2026

हक्कांसाठी समाज एकवटण्याची गरज – डॉ. अनुपम बेगी यांचे आवाहन

पुणे प्रतिनिधी – शंकर जोग,
पुणे कॅम्प परिसरातील वीर गोगादेव समाज मंदिर, स्वर्गीय वसंतराव चव्हाण मेमोरियल हॉल येथे मेहतर वाल्मिकी समाज, रुखी समाज आणि सफाई मजदूर समाजातील प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीस प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन दादा जोशी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय मजदूर काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अनुपम बेगी यांनी केले होते.

बैठकीदरम्यान डॉ. अनुपम बेगी यांनी केंद्र सरकार, महाराष्ट्र तसेच विविध राज्यांतील महापालिकांमध्ये मेहतर वाल्मिकी समाजाच्या प्रश्नांसाठी प्रभावी प्रतिनिधित्व नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. समाजाच्या हक्क आणि अधिकारांसाठी एकत्र येऊन रस्त्यावर उतरून संघर्ष करणे आवश्यक असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

यावेळी विविध पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच माजी आमदार मोहन दादा जोशी यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाला कविराज संघेलिया, चंद्रकांत किसन चव्हाण, मनोज पटेलिया, मनोज लालबिगे, परविन लालबिगे, सतीश लालबिगे, रवी भिंगानिया, यश चव्हाण, भारत जाधव, गोपाल सोलंकी, जीवन द्याल, महेंद्र चव्हाण, विपुल उमंदे, अमृतपाल डिक्की, शारदा सोडी, किशोर भगत, सौरभ वाल्मिकी, मंथन म्हेत्रे, सूर्यकांत यादव, विलास मकवाणी, गीता ननावरे, नितीन प्रसाद, रवी भोंगळे, मनोज तूसंबड आदी मान्यवर उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button