March 29, 2026

पुण्यात ‘छत्रपती कलाकार क्रिकेट लीग’चे आयोजन; ट्रॉफीचे भव्य लाँच, कलाकारांचा उत्स्फूर्त सहभाग

पुणे: ‘छत्रपती कलाकार क्रिकेट लीग’चे आयोजन येत्या 13 एप्रिल आणि 14 एप्रिल रोजी पुण्यात होणार असून, या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर 25 मार्च रोजी कोथरूड येथे ऑक्शनचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विजेत्या संघासाठी देण्यात येणाऱ्या ट्रॉफीचे भव्य लाँच करण्यात आले.

या वेळी सर्व टीम ओनर, आयकॉन प्लेअर तसेच विविध क्षेत्रातील कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले.

या क्रिकेट लीगचे आयोजन रश्मी पाटील, आनंद कुंदूर आणि आहान देवडीगा यांनी केले आहे. आयोजकांनी या स्पर्धेसाठी सर्व सहभागी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून खेळाडूंचे मनोबल वाढवावे, असे आवाहनही केले.

ही स्पर्धा पुण्यातील क्रीडाप्रेमींसाठी एक आकर्षण ठरणार असून, कलाकार आणि क्रिकेट यांचा संगम अनुभवण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button