May 10, 2026

राष्ट्रीय जिल्हा पंचायत असोसिएशनच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी मा. श्री. मिलिंद वाळंज यांची नियुक्ती!

पुणे : राष्ट्रीय जिल्हा पंचायत असोसिएशनच्या वतीने पुणे जिल्हाध्यक्षपदी मिलिंद नंदकुमार वाळंज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थापक अध्यक्ष कैलास गोरे-पाटील तसेच प्रशिक्षण विभाग प्रमुख शरद बुड्ढे-पाटील यांच्या शिफारशीनुसार ही निवड जाहीर करण्यात आली.

ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद स्तरावर केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत संस्थेच्या पुणे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी राष्ट्रीय जिल्हा पंचायत असोसिएशनच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी मिलिंद वाळंज यांची नियुक्ती यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. सामाजिक प्रश्नांवर सातत्याने काम करत स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांचे प्रश्न शासनापर्यंत पोहोचविण्याचे कार्य त्यांनी प्रभावीपणे केले आहे.

राष्ट्रीय जिल्हा पंचायत असोसिएशन ही देशातील विविध राज्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांच्या हक्कासाठी कार्य करणारी संघटना असून सदस्यांचे अधिकार, मान-सन्मान आणि विविध मागण्यांसाठी सातत्याने पाठपुरावा करत आहे. आगामी काळात संघटनेची बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी आणि पुणे जिल्ह्यात संघटनेचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी राष्ट्रीय जिल्हा पंचायत असोसिएशनच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी  मिलिंद वाळंज यांची नियुक्ती कार्यरत राहतील, असा विश्वास संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

नियुक्तीनंतर बोलताना राष्ट्रीय जिल्हा पंचायत असोसिएशनच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी  मिलिंद वाळंज यांची नियुक्ती म्हणाले की, संघटनेने माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवत पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्न केले जातील. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांचे प्रश्न शासनदरबारी मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून सक्रियपणे काम करण्यात येईल.

या नियुक्तीबद्दल विविध सामाजिक, राजकीय आणि स्थानिक स्वराज्य क्षेत्रातील मान्यवरांकडून श्री. मिलिंद वाळंज यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button