March 23, 2026

येरवड्यात दिवाळी फराळ कार्यक्रम उत्साहात संपन्न

येरवडा:गांधीनगर: संकल्प युवा प्रतिष्ठान तथा सामाजिक संस्था तसेच न्यू होप सोशल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिला विशेष दिवाळी फराळ आणि स्नेह मिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता , ह्या वेळी समूहसंघटिका प्रभावती गायकवाड यांनी उपस्थित महिलांना शासकीय योजनांच्या बद्दल माहिती दिली, त्याच बरोबर त्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन केले.
या वेळी बोलत असताना न्यू होप च्या संचालिका माया ओव्हाळ यांनी महिलांच्या विकासासाठी संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणारे कार्यक्रम महिलांना सविस्तर सांगितले आणि उपस्थितांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन संबोधित केले.
महिलांनी फराळाचा आस्वाद घेत, एकमेकींना शुभेच्छा दिल्या,

सुमती नलावडे, जयश्री डोळस, स्नेहा डोळस, लीला सोनवणे, विशाखा गायकवाड ,अक्षता राजगुरू, श्रद्धा शेट्टी, रुपाली ठोकळ, विजया पंडित, लता हजारे, दामिनी गवळी,काजल भारस्कर, शाहीन सय्यद, अस्लम खान, शैलेश राजगुरू, तुषार महाजन, विकी औरंगे, प्रकाश पंडित, मनोज शेट्टी, मनोज ठोकळ, यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमासाठी उपस्थिती दर्शविली.

या कार्यक्रमाचे नियोजन संकल्पचे आकाश पंडित, सौरभ गवळी, सागर वीर, तुषांत सकट, ऋषिकेश भिंगारदिवे, कुणाल नहार, विशाल भारस्कर, संकेत ढगे, सागर चव्हाण यांनी केले होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button