March 23, 2026

मॅजिक कार्वो इंडिया एलएलपीच्या ‘कारवो – वॉटरलेस कार स्पा’ (carwo) ॲपचे अभिनेत्री उर्वशी रौतेला यांच्या हस्ते अनावरण

पुणे : पर्यावरण संरक्षण आणि पाण्याची बचत या दोन्ही बाबी लक्षात घेऊन पुण्यातील तरुण उद्योजक साहिल अग्रवाल यांनी पाण्याशिवाय वाहनांची सफाई करणारे अत्याधुनिक इको-फ्रेंडली तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्यांच्या मॅजिक कार्वो इंडिया एलएलपी कंपनीच्या ‘कारवो – वॉटरलेस कार स्पा’ (carwo) या मोबाईल ॲप प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने अभिनेत्री उर्वशी रौतेला यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

सध्याच्या घडीला एका कारच्या सफाईसाठी मोठ्या प्रमाणावर पाणी वापरले जाते. मात्र ‘कारवो’ (carwo) या तंत्रज्ञानामुळे गाडी स्वच्छ करण्यासाठी पाण्याची आवश्यकता भासत नाही, त्यामुळे हजारो लिटर पाण्याची बचत शक्य होते. साहिल अग्रवाल आणि त्यांची बहीण श्रुती अग्रवाल हे मागील दोन वर्षांपासून कारच्या इको-फ्रेंडली देखभाल आणि सफाई क्षेत्रात कार्यरत असून, आज पुण्यातील अनेक ग्राहकांचा त्यांना भरघोस प्रतिसाद मिळत आहे.

साहिल अग्रवाल यांनी सांगितले की, वाहनांची सफाई करताना पाण्यामुळे कारच्या रंगावर परिणाम होतो, तसेच पाण्याचे डागही राहतात. या समस्यांवर कायमस्वरूपी उपाय शोधण्याच्या उद्देशाने वॉटरलेस कार क्लीनिंग तंत्रज्ञान विकसित करण्यात आले. सध्या कंपनी केवळ कारची सफाईच नव्हे तर इंटेरियर क्लीनिंग, पॉलिशिंग, डिटेलिंग तसेच कार केअरशी संबंधित विविध सेवा ‘वॉटरलेस कार स्पा’च्या माध्यमातून पुरवत आहे.

भविष्यात पुण्याच्या बाहेर जाऊन संपूर्ण देशभरात ‘कारवो’च्या माध्यमातून कारशी संबंधित सर्व सेवा उपलब्ध करून देण्याचा कंपनीचा मानस असून, त्यासाठी स्वतंत्र वेबसाईट आणि मोबाईल ॲप विकसित करण्यात आले आहे.

यावेळी अभिनेत्री उर्वशी रौतेला म्हणाल्या, “पर्यावरणाची काळजी घेणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. ‘कारवो’ (carwo) सारख्या उपक्रमांमुळे पाण्याची बचत तर होतेच, शिवाय शाश्वत विकासालाही चालना मिळते. साहिल आणि त्यांची टीम समाजासाठी उपयुक्त असे कार्य करत असून, अशा इको-फ्रेंडली उपक्रमांना अधिकाधिक प्रोत्साहन मिळायला हवे.”

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button