March 23, 2026

तुझ्याचसाठी – एक मन विखुरलेलं’ या वेबमालिकेचा भव्य लॉन्च सोहळा उत्साहात संपन्न

पुणे : चित्रपट, ओटीटी आणि टीव्ही या तीनही माध्यमांचा आपला प्रेक्षक वर्ग , आर्थिक गणित वेगवेगळे आहे. अनेकांना मालिका करायच्या आहेत मात्र टीव्हीच्या मर्यादा लक्षात घेता सर्वांना संधि मिळतेच असे नाही. आज मराठी मनोरंजन विश्व एक नवीन सुरुवात करत आहे ते म्हणजे युट्यूब मालिका, तुझ्याचसाठी – एक मन विखुरलेलं या मालिकेमुळे मराठी कलाविश्वाला नवीन व्यासपीठ मिळेल असा विश्वास अखिल भारतिय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी व्यक्त केला.

पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे आयोजित कार्यक्रमात ‘तुझ्याचसाठी – एक मन विखुरलेलं; या पहिल्या मराठी यूट्यूब मालिकेचा लॉन्च सोहळा उत्साहात संपन्न झाला, यावेळी राजेभोसले बोलत होते. याप्रसंगी प्रसिद्ध गायक साजन बेंद्रे, सुप्रसिद्ध अभिनेते शिवभक्त सचिन गवळी, या वेबमालिकेचे निर्माते सर्जेराव गायकवाड आणि राम अश्रुजी पाटील , दिग्दर्शक ओंकार नागनाथ पिंपळे यांच्यासह मालिकेतील सर्व कलाकार व तंत्रज्ञ उपस्थित होते.

पुढे बोलताना मेघराज राजेभोसले म्हणाले, आपल्याकडे गुणवंत कलाकार अनेक आहेत , माध्यमांच्या मर्यादेमुळे सर्वाना संधि मिळत नाही या मालिकेच्या निमित्ताने एक नवीन व्यासपीठ कलाकारांना मिळेल, या मालिकेचे निर्माते त्यांचे आर्थिक गणीतही जुळवतील कारण निर्मात्याला त्यांचे पैसे रिटर्न मिळणे अत्यंत महत्वाचे असते. नव्या माध्यमावर ही संपूर्ण टीम मेहनत घेत आहे त्यांना निश्चित यश मिळेल, तसेच मालिकेच्या संकल्पनेचे कौतुक करत, मराठी डिजिटल माध्यमांसाठी ही मालिका मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी साजन बेंद्रे, सचिन गवळी, सर्जेराव गायकवाड, राम पाटील आणि दिग्दर्शक ओंकार नागनाथ पिंपळे यांनी आपल्या मनोगतातून मालिकेच्या निर्मिती मागील भूमिका विषाद केली.

‘तुझ्याचसाठी – एक मन विखुरलेलं’ ही पहिली यूट्यूब मालिका येत्या 9 फेब्रुवारी पासून सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 8 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर सोनवणे यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button