March 23, 2026

विद्यार्थ्यांसाठी “बाल सुरक्षा” मार्गदर्शन: मानखुर्द पोलीस स्टेशनचे PSI ज्ञानेश्वर उबाळे यांचा दिशा ज्योत फाउंडेशनच्या विद्यार्थी संसदेत सहभाग


दिशा ज्योत फाउंडेशनच्या विद्यार्थी संसद उपक्रमात मानखुर्द पोलीस स्टेशन येथील वरिष्ठ पोलीस अधिकारी (PSI) ज्ञानेश्वर उबाळे यांनी विद्यार्थ्यांना “बाल सुरक्षा” या महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन केले. या मार्गदर्शन सत्रामध्ये मुलांच्या सुरक्षेशी संबंधित विविध कायदे, त्यांचे हक्क तसेच आपत्कालीन परिस्थितीत कशी काळजी घ्यावी याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनीही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना अनेक महत्त्वपूर्ण आणि अनुभवाधारित प्रश्न विचारले. पोलिस प्रशासनाकडून या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देण्यात आली, त्यामुळे विद्यार्थ्यांना पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत अधिक स्पष्ट माहिती मिळाली.

यावेळी विद्यार्थ्यांमध्ये कायद्याबद्दल जागरूकता निर्माण होणे आणि समाजात सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी पोलिस व विद्यार्थी यांच्यात सकारात्मक संवाद होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

दरम्यान, पुढील आठवड्यात दिशा ज्योत फाउंडेशनच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मानखुर्द पोलीस स्टेशनला भेट आयोजित करण्यात येणार आहे. या भेटीद्वारे विद्यार्थ्यांना पोलिसांच्या कामाची प्रक्रिया, दैनंदिन जबाबदाऱ्या आणि कायदा अंमलबजावणीची प्रत्यक्ष माहिती मिळणार आहे.

दिशा ज्योत फाउंडेशन ही संस्था शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांचे आरोग्य, पोषक आहार, कला, विविध स्पर्धा तसेच सुरक्षा यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर मोठ्या प्रमाणात काम करत असून भविष्यातही अशा उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करत राहणार असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button