March 23, 2026

वाघोलीत ६८वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला दमदार सुरुवात; सेमी फायनलमध्ये मल्लांचा जलवा

वाघोली, पुणे : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने व रामकृष्ण अण्णा सातव पाटील कर्तव्य फाऊंडेशन आयोजित ६८ वी महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी किताब कुस्ती स्पर्धा वाघोली, पुणे येथील स्व. अजितदादा पवार क्रीडानगरीत सुरू आहे.

गुरुवारी सकाळच्या सत्रात ५७ व ८६ किलो वजनी गटाच्या अत्यंत चुरशीच्या लढती हजारो कुस्ती शौकीनांच्या उपस्थितीत इतर फेऱ्यांसह उपांत्य फेरीच्या चित्तथरारक लढती
झाल्या. यामध्ये पदकांचे दावेदार म्हणून ज्यांच्याकडे
पाहिले जात होते. अशा काहींचे आव्हान संपुष्टात आल्याने त्यांचे पदकाचे स्वप्न भंगले.

यामध्ये माती विभागातील ५७ किलो गटाच्या उपांत्य फेरीत (सेमी फायनल) पुणे शहरच्या ओंकार निगडे याने कोल्हापूर शहरच्या सुदर्शन पाटीलचा ७-० तर कोल्हापूर जिल्ह्याच्या मृणाल पाटीलने सोलापूर जिल्ह्याच्या अजय निंबाळकर याच्यावर ५-१ अशी मात करत अंतिम फेरीत प्रवेश केला.

माती विभागातील ८६ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत (सेमी फायनल) सोलापूर शहरच्या मशीद शेखने सोलापूर जिल्ह्याच्या जय जाधवचा १०-० असा दणदणीत पराभव केला. तर पुणे शहरच्या चंद्रहार नरळे याने साताऱ्याच्या विशाल कोकरे यांचा अनपेक्षित रित्या ४-२ अशा चुरशीच्या लढतीत पराभव अंतिम फेरीत प्रवेश केला.

गादी विभागातील ५७ किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत (सेमी फायनल) कोल्हापूर शहराचा राष्ट्रीय मल्ल अक्षय ढेरे याने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत कल्याणच्या विनायक भोईरचा १३-२ असा मोठ्या गुण फरकाने पराभव केला.तर दुसऱ्या लढतीत नाशिक जिल्ह्याच्या शुभम आचपाळे याने साताऱ्याच्या साहिल गोफणेला १०-२ अशी मात देत अंतिम फेरी गाठली.

सायंकाळी अंतिम फेरीत कोण विजेता ठरणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले असून पुढील लढती अधिक रंगतदार होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्र केसरी किताबासाठी गुरुवारी सायंकाळच्या सत्रात पहिल्या फेरीत होणाऱ्या लढती

** माती विभाग**
१) महादेव काळे (लातूर ) विरुद्ध समाधान दगडे (पिंपरी चिंचवड)

२) विशाल बनकर (सोलापूर शहर) विरुद्ध महेंद्र गायकवाड (सोलापूर जिल्हा)

३) ज्ञानेश्वर जमदाडे (अमरावती) विरुद्ध बाळू बोडके (नाशिक)

४) सुदर्शन कोतकर (अहिल्यानगर) विरुद्ध सुबोध पाटील (पालघर)


गादी विभाग
१) आदित्य मोहोळ (वाशिम) विरुद्ध पवन रुपनवर (ठाणे)

२) हर्षवर्धन सोनव (धुळे ) विरुद्ध अरुण चरवडे (जालना)

३) गजानन भोयर (हिंगोली) विरुद्ध अंकुश गायकवाड (कल्याण)

४) जय पाटील (सोलापूर) विरुद्ध कालीचरण सोनलकर (नंदुरबार)

५) प्रत्येक जगताप (पुणे जिल्हा ब) विरुद्ध ओम जाधव (छत्रपती संभाजी नगर

६) प्रदीप बेहरे (सोलापूर) विरुद्ध सतपाल शिंदे (सांगली)

७) यशराज अमराळे (पिंपरी चिंचवड) विरुद्ध संस्कार लटके (रत्नागिरी)

८) ओम सिंग (चंद्रपूर) विरुद्ध अक्षय मंगवडे (सोलापूर)

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button