March 23, 2026

नगरसेवक सनी निम्हण यांच्या प्रयत्नातून औंध–डेक्कन बससेवा पुन्हा सुरू

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) तर्फे औंध ते डेक्कन जिमखाना दरम्यान धावणारी १०५ क्रमांकाची बससेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. मागील काही महिन्यांपासून हा मार्ग बंद असल्याने औंध-बाणेर परिसरातील नागरिकांकडून सातत्याने सेवा सुरू करण्याची मागणी होत होती. नगरसेवक चंद्रशेखर उर्फ सनी निम्हण यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर ही बससेवा पुन्हा सुरू झाली आहे.

आज सकाळी सुमारे ८.१५ वाजता पहिल्या बसचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

या वेळी पीएमपीएमएलचे संचालक अजय खेडेकर, उपमहापौर परशुराम वाडेकर, नगरसेवक सनी निम्हण, नगरसेविका भक्ती गायकवाड, सपना छाजेड यांच्यासह आनंद छाजेड, शिरीष नाईकरे, रिपाई शिवाजीनगर युवक अध्यक्ष महादेव साळवे, मनोज दळवी, वसंत जुनावणे, निलेश गायकवाड, सुजाता पाटील, सूर्यकांत कळापुरे, सतीश तारू, मारुती पाटील, जॉन प्रकाश, मंगल जाधव, सुरेखा कुलकर्णी तसेच स्थानिक नागरिकआणि पीएमपीएमएल अधिकारी  उपस्थित होते.

डीपी रोड परिसरात अनेक वर्षांपासून बंद असलेली ही बससेवा पुन्हा सुरू झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. ही सेवा सकाळी ५.३० ते रात्री ८.१५ पर्यंत सुरू राहणार असून या मार्गावर दररोज आठ फेऱ्या होणार आहेत. त्यामुळे औंध-बाणेर ते डेक्कन परिसरातील प्रवास अधिक सोयीस्कर होणार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button