मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची ६८ वा महाराष्ट्र केसरी विजेता हर्षवर्धन सदगीर यांच्यासह स्पर्धेचे आयोजक रामकृष्ण सातव यांनी भेट घेतली.
मुंबई : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची ६८ वा महाराष्ट्र केसरी विजेता हर्षवर्धन सदगीर यांच्यासह स्पर्धेचे आयोजक रामकृष्ण सातव यांनी भेट घेतली. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हर्षवर्धन सदगीर यांच्या कामगिरीचे तसेच स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ व आयोजकांचे कौतुक केले. यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष पै. संदीप भोंडवे, पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष मेघराज कटके, केतन जाधव उपस्थित होते.

