March 25, 2026

आळंदी येथे श्री रामनवमी निमित्त शिंदेशाही चंदन उटी सोहळ्याचे आयोजन

पुणे, आळंदी (प्रतिनिधी): श्री रामनवमी निमित्त आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊली देवस्थानाच्या वतीने भव्य शिंदेशाही चंदन उटी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे आयोजन गुरुवार, दिनांक २६ मार्च २०२६ रोजी दुपारी ३:०० वाजता करण्यात आले आहे.

हा सोहळा श्री ज्ञानेश्वर माऊली मंदिर, आळंदी, पुणे येथे पार पडणार असून, यामध्ये श्रीमंत महाराज महादजी शिंदे सरकार शाही चंदन उटी सोहळ्याचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे. या पवित्र सोहळ्याचा लाभ शिंदे परिवार, नातेवाईक तसेच सर्व भाविकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

सोहळ्यानिमित्त श्रीमंत महादजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार असून, त्यांच्या आळंदी देवस्थानावरील योगदानावर आधारित व्याख्यानमालेचे आयोजन देखील करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन श्री संत ज्ञानेश्वर माऊली आळंदी देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आले असून, स्वागतकर्ते म्हणून –श्रीमंत महाराज महादजी शिंदे सरकार स्वराज्य रथ समिती, पुणे श्रीमंत महाराज महादजी शिंदे सरकार फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य श्रीमंत शिंदे सरकार ट्रस्ट यांचा सहभाग आहे.

कार्यक्रमास केंद्रीय दूरसंचार मंत्री श्रीमंत महाराज ज्योतिरादित्य शिंदे सरकार (कवळे) यांचे शुभ आशीर्वाद लाभणार आहेत.

या धार्मिक आणि ऐतिहासिक सोहळ्यामुळे आळंदी परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार असून, मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button