कसबा पेठेत गुड फ्रायडे निमित्त धार्मिक कार्यक्रमांची उत्साहात सांगता
पुणे प्रतिनिधी शंकर जोग :
गुड फ्रायडे निमित्त कसबा पेठेतील 18 व्या शतकामधील ब्रदर देशपांडे मेमोरियल चर्चमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन उत्साहात करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये उपासना, धार्मिक गीतांचा कार्यक्रम, पुनरुत्थान दिन उपासना, दूढिकरण विधी तसेच सुवार्ता दिंडी यांचा समावेश होता.
या प्रसंगी रेव्ह. रंजन राठोड यांनी वधस्तंभावरील येशू ख्रिस्ताने उच्चारलेल्या सात वचनांवर प्रीती, प्रेम, क्षमा, दया आणि शांती या मूल्यांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन मिस वर्षा देठे यांनी केले.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी चर्च अध्यक्ष सुनील चोपडे, सचिव सुनील भंडारी, खजिनदार राजेंद्र शिंदे, माजी सचिव नोएल देठे तसेच पीटर जाधव, विश्वास कालेबार, एडविन अँथोनी आदींनी विशेष परिश्रम घेतले. या वेळी मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधव उपस्थित होते.
