पुणे कॅम्पमध्ये हनुमान जयंतीनिमित्त भव्य महाआरती व प्रसाद भंडाऱ्याचे आयोजन
पुणे : हनुमान जयंती निमित्ताने पुणे कॅम्प परिसरात धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून पुणे कॅम्प हनुमान जन्म उत्सव समितीच्या वतीने गुरुवार, २ एप्रिल २०२६ रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात संध्याकाळी ७ वाजता महाआरती, भजन-कीर्तन तसेच प्रसाद भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा धार्मिक सोहळा दस्तूर मुलांची शाळा समोर, पुना क्लब परिसर, पुणे कॅम्प येथे पार पडणार आहे.
भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रभू श्री हनुमानाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा तसेच प्रसाद भंडाऱ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
या उत्सवाचे आयोजन भारत रत्न सार्वजनिक तरुण मंडळ यांच्या सहकार्याने होत असून परिसरातील भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समितीचे अध्यक्ष पृथ्वी चौहान यांच्यासह वर्धन चौहान, नेहल चौहान, पंकज चौहान, आदित्य, पवन, हर्षत, उदय, धामीन आणि राजेश यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.
