May 10, 2026

Shabbir Kumar यांच्या गायन प्रवासाला 44 वर्षे पूर्ण; पुण्यात फॅन क्लबकडून जल्लोषात उत्सव


पुणे : दि लिजेंडरी सिंगर शब्बीर कुमार जी फॅन क्लब व S.A.I म्युझिक अकॅडमी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 80 च्या दशकातील बॉलिवूडचे सुप्रसिद्ध गायक Shabbir Kumar यांच्या गायन कारकिर्दीला 44 वर्षे पूर्ण झाल्याचा आनंदोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

4 एप्रिल 2026 रोजी त्यांच्या फिल्मसिटी बॉलिवूडमधील प्लेबॅक सिंगर म्हणून केलेल्या पहिल्या गाण्याला 44 वर्षे पूर्ण होऊन त्यांनी 45 व्या वर्षात पदार्पण केले. यानिमित्त येरवडा येथे फॅन क्लबच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमात शब्बीर कुमार यांनी गायलेल्या लोकप्रिय गाण्यांना उजाळा देण्यात आला तसेच केक कापून आनंद साजरा करण्यात आला. त्यांच्या “जब हम जवां होंगे” पासून ते “I Don’t Know What To Do” सारख्या गाण्यांची आजही प्रेक्षकांमध्ये लोकप्रियता कायम असल्याचे यावेळी दिसून आले.

यावेळी फॅन क्लबच्या सदस्यांनी भारत सरकारकडे गाण्यांच्या माध्यमातून विनंती करत Shabbir Kumar यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव करण्यात यावा, अशी मागणी केली.

फॅन क्लबच्या वतीने रसिकांना आवाहन करण्यात आले की, आजवर जसे त्यांनी शब्बीर कुमार यांच्या गाण्यांवर प्रेम केले तसेच प्रेम पुढेही कायम ठेवावे.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शशिकांत अस्वरे, बापू ननावरे, इनायत शेख, एजाज पुणेकर, वसंत सगट, महेंद्र तांबे, निजाम शेख, देवेंद्र गुप्ता, सुनिता धेंडे आणि जब्बिन शेख यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button