May 10, 2026

झेप सामाजिक संस्था आणि वेलवेट पब्लिकेशन करणार जागतिक विक्रम

पुणे / पिंपरी – चिंचवड : नवोदित लेखकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी निर्माण झालेले वेलवेट पब्लिकेशन दहा महिन्यात नवोदितांचे हक्काचे प्रकाशन बनले आहे. वेलवेट पब्लिकेशनच्या वतीने एकाच वेळी ५० पुस्तके प्रकाशित करण्याचा जागतिक विक्रम होणार असल्याची माहिती प्रकाशनाच्या संस्थापक वर्षा विशाल ठुकरूल आणि सिंधू बागवे यांनी दिली. 

सांगवी येथील नटसम्राट निळु फुले नाट्यगृहात १२ एप्रिल २०२६ रोजी ,सकाळी १०:३० ते २:३० वाजता आयोजित  कार्यक्रमात हा जागतिक विक्रम होणार असून त्यांची एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद होणार आहे. या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध लेखिका रोहिणी निनावे, गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नाव असलेल्या मंजुश्री ओक आणि पत्रकार समीक्षक सौमित्र पोटे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 

पुढे बोलताना वर्षा विशाल ठुकरूल म्हणाल्या, आमची प्रकाशन संस्था ही व्यावसायिक नाही, ज्या लोकांना आपली पुस्तके छापता येत नाहीत अशा लोकांना आम्ही त्यांची पुस्तके छापून देतो, आम्ही ना नफा ना तोटा  या तत्वावर नवोदित  लेखकांना त्यांची पुस्तके छापून देत आहोत. अगदी २५ प्रतीसुद्धा आम्ही देत आहोत. मागील दहा महिन्यात आम्ही ६५ पुस्तके छापून दिली आहेत. १२ एप्रिलला होणाऱ्या कार्यक्रमात बहुतांश लेखकांचे पहिले पुस्तक प्रकाशित होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

हा जागतिक विक्रम फक्त प्रकाशनाचा नाही तर लिहिणाऱ्या प्रत्येक हातांचा आहे, असं पब्लिकेशनच्या सदस्या लेखिका कवयित्री स्मिता मिलिंद, लेखिका कवयित्री स्वाती कुंभार आणि लेखिका कवयित्री डॉ सुनिता चौधरी म्हणाल्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button