May 10, 2026

संकटाचे संधीत रुपांतर करणे ही यशाची गुरुकिल्ली –  नरेंद्र गोयल यांचे प्रतिपादन

पुणे: प्रतिनिधी

संकटाच्या काळात कर्तृत्वाचा खरा कस लागत असतो. संकटाचे संधीत रूपांतर करणे हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन देशातील जनरेटर्स उत्पादनात आघाडीवर असलेल्या श्याम ग्लोबल टेक्नॉलॉजीचे संचालक नरेंद्र गोयल यांनी केले.

कंपनीच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात गोयल बोलत होते. यावेळी महिंद्रा कंपनीचे  जनरल मॅनेजर प्रॉडक्ट मॅनेजमेंट अमित देसाई,  महिंद्राचे सीनियर जनरल मॅनेजर अंकुर श्रीवास्तव, महेश सरवणकर, श्याम ग्लोबलचे ऑपरेशन्स हेड गुलशन खजुरिया, रुची गोयल आदि मान्यवर आणि राज्यभरातील महिंद्रा जेनसेटचे प्रमुख वितरक आणि श्याम ग्लोबलचे कर्मचारी आणि अधिकारी आपल्या परिवारासह उपस्थित होते.

कंपनीच्या आठ वर्षाच्या प्रवासात अनेक चढ-उतार अनुभवाला आले. आज श्याम ग्लोबल ही देशातील जनरेटर उत्पादन करणाऱ्या प्रमुख पाच कंपन्यांपैकी एक असली तरीही जनरेटर उत्पादनासह इतर काही क्षेत्रात कंपनीने कार्यविस्तार केला आहे. पुण्यासारख्या शहरांमध्ये असलेली पार्किंगची समस्या लक्षात घेऊन अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारावर 17 मजल्यापर्यंत स्वयंचलित पार्किंग यंत्रणा उभारण्याचे काम कंपनीमार्फत सुरू आहे. त्याचप्रमाणे अमेरिकेतील पीए रोबोटिक्स या कंपनीसाठी आम्ही रोबोट तयार करून त्याची निर्यात करत आहोत, असेही गोयल यांनी सांगितले.

केवळ सात कर्मचाऱ्यांच्या साथीने सुरू झालेल्या श्याम ग्लोबल या कंपनीने आठ वर्षात मोठी मजल मारली असून सध्या कंपनी 300 हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. या वाटचालीचा आम्हाला अभिमान असून आगामी तीन ते पाच वर्षात तीन पट व्यवसाय वृद्धीचे लक्ष्य आम्ही ठेवले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कर्मचारी हे कंपनीचा कणा असून व्यावसायिक संबंध आणि व्यक्तिगत संबंध याचा समतोल साधण्याबाबत कंपनीत कटाक्ष पाळाला जातो. सर्व अधिकारी आणि कर्मचारी हे श्याम ग्लोबल परिवाराचाच एक भाग आहेत, अशी आमची धारणा आहे. त्यांच्या सहभागाशिवाय कंपनी इतकी मोठी झेप घेऊ शकली नसती, याची आपल्याला जाणीव आहे, असे कंपनीच्या संचालिका रुची गोयल यांनी यावेळी सांगितले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी श्याम ग्लोबलच्या यशाचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तर कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी विविध मनोरंजनात्मक खेळांचा आनंद लुटला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button