May 10, 2026

संत निरंकारी मिशन तर्फे फॉरेस्ट पार्क,चंदननगर येथे आयोजित रक्तदान शिबिरामध्ये ५५१ युनिट रक्तदान

पुणे दि. २५ एप्रिल २०२६: हृदयात करुणा, प्रेम आणि एकात्मतेची दिव्य जाणीव जागृत झाली की, मनुष्य आपल्या संकुचित स्वार्थांच्या पलीकडे जाऊन संपूर्ण सृष्टीच्या कल्याणाचे प्रभावी माध्यम बनतो. परोपकार, करुणा आणि परमार्थ या उदात्त मूल्यांनी अधोरेखित झालेला हा दिवस उच्च मानवी मूल्यांची जाणीव अधोरेखित करणारा ठरला; ‘मानवाने मानवावर प्रेम करावे, एकमेकांचे आधार बनावे’ हा संदेश शब्दांच्या पलीकडे जाऊन जनमानसात ठळकपणे रुजला.

‘मानव एकता दिवस’ २४ एप्रिल रोजी युगप्रवर्तक बाबा गुरबचन सिंहजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ, देशभरातील हजारो सत्संग केंद्रांवर हा दिवस श्रद्धा व समर्पणभावाने यशस्वीरीत्या पार पडला. हे केवळ एक आयोजन नव्हते, तर प्रेम, सद्भावना आणि निष्काम सेवेचे प्रभावी प्रतिबिंब म्हणून ते सर्वत्र उमटले.

मानव एकता दिवसानिमित्त संत निरंकारी सत्संग भवन ,फॉरेस्ट पार्क,चंदननगर, पुणे येथे विशाल रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. यशवंतराव रुग्णालय ,ससून रुग्णालय,औंध रुग्णालय रक्तपेढी तसेच निरंकारी रक्तपेढीच्या अनुभवी डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांनी रक्तदात्यांची आवश्यक आरोग्य तपासणी करून सुरक्षित, सुव्यवस्थित आणि प्रभावी पद्धतीने रक्तदान प्रक्रिया पूर्ण केली. या उपक्रमातून ५५१ युनिटचे संकलन करण्यात आले. संपूर्ण आयोजनात स्वच्छता, सतर्कता आणि सेवाभाव यांना विशेष प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे हा उपक्रम केवळ जीवनदायी सेवापुरता मर्यादित न राहता मानवता, करुणा आणि सामाजिक उत्तरदायित्वाचे उच्च प्रतीक म्हणून समोर आला.

संत निरंकारी मंडळाचे सचिव आदरणीय श्री जोगिंदर सुखीजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील सुमारे २१२ ठिकाणी मानव एकता दिवसानिमित्त रक्तदान शिबिरांचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते . या माध्यमातून जवळपास ४०,००० युनिट रक्त संकलित करण्यात आले, जे निष्काम सेवा, परोपकार आणि मानवतेप्रती असलेल्या समर्पणाची प्रभावी अभिव्यक्ती ठरले.

विशेष म्हणजे, रक्तदानाची ही पावन परंपरा मागील चार दशकांपासून अखंडपणे सुरू आहे. आतापर्यंत ९,१७४ रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून सुमारे १५,००,२३० युनिट रक्त संकलित करण्यात आले असून, मानवसेवेप्रती निरंकारी मिशनची अटळ बांधिलकी यामुळे अधोरेखित होते.

युगप्रवर्तक बाबा गुरबचन सिंह जी यांनी सत्य, साधेपणा आणि सद्भावनेचा मार्ग दाखवत तरुणांना नशामुक्त जीवनाचा अवलंब करण्याचे आणि आपली ऊर्जा समाजसेवेसाठी वापरण्याचे आवाहन केले. बाबा हरदेव सिंह जी यांनी “रक्त नाड्यांतून वाहावे, नाल्यांतून नव्हे” हा संदेश देत सेवेला जीवनाचा अविभाज्य घटक बनवले. हाच सेवा-संदेश सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आजही प्रभावीपणे पुढे नेला जात आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button