May 10, 2026

बुद्ध पौर्णिमेनिमित्त येरवड्यात पंचधातू बुद्धमूर्तीची भव्य स्थापना; मिरवणुकीत पारंपरिक ढोल-ताशांचा गजर, महिलांची उत्स्फूर्त उपस्थिती

पुणे प्रतिनिधी दिनांक:01 मे:
बुद्ध पौर्णिमेच्या पावन निमित्ताने येरवडा येथील दिक्षांत बुद्ध विहार, शास्त्री नगर येथे भगवान गौतम बुद्ध यांच्या पंचधातूच्या भव्य मूर्तीची स्थापना मोठ्या उत्साहात करण्यात आली. थायलंड निर्मित या आकर्षक मूर्तीचे पूजन भंतेजी यांच्या हस्ते विधिवत करण्यात आले.

या सोहळ्याच्या निमित्ताने सायंकाळी ५:३० वाजता भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. मिरवणुकीत पारंपरिक वाद्य, ढोल-ताशांच्या गजरात परिसर दुमदुमून गेला. नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग घेतला, विशेषतः महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
या कार्यक्रमाचे आयोजन बाप्पु भाऊ खरात यांनी केले.


या कार्यक्रमाला सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यामध्ये राहुल भंडारी, सचिन धिवार, शंकर भैय्या चव्हाण, हनिफ शेख, अन्वर पठाण, मनीष बन्सल, दीपक बुंदले, सागर वानखेडे, शाम डीसूझा, अक्षय नानेकर, अण्णा वाल्मीकी तसेच B K ग्रुप चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.

धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणात संपन्न झालेल्या या कार्यक्रमामुळे परिसरात भक्तीमय आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button