May 10, 2026

भारतीय बौद्ध महासभा व भीमज्योती बौद्ध सेवक समाज यांच्या संयुक्त विद्यमाने चिखलवाडी विहारात पाच दिवसीय युवक श्रामणेर शिबिर संपन्न

भारतीय बौद्ध महासभा तालुका औंध, बोपोडी, शिवाजीनगर आणि भीमज्योती बौद्ध सेवक समाज चिखलवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने चिखलवाडी विहार येथे पाच दिवसीय युवक श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात युवकांना बौद्ध धम्म, शिस्त, ध्यान आणि सामाजिक बांधिलकी यांचे मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बी. एल. येडे होते. प्रमुख उपस्थितीमध्ये बौद्धाचार्य दिलीप सरोदे, दादासाहेब रणपिसे, राजरत्न थोरात, विठ्ठल कांबळे, मोहन रोकडे, गोरख निकाळजे, रवींद्र बाराथे, नरेंद्र भालेराव, महानंदा डाळिंबे, रेखाताई काळे, सुनील भालेराव, किशोर भंडारे, विजयराव कांबळे, दिलीप शिंदे, अशोक गायकवाड, प्रा. अरुण शेलार, योगेश गायकवाड, ताराचंद ढोबळे, विजय जाधव आदी उपासक उपस्थित होते.

या प्रसंगी पुणे जिल्हा व शहरात बौद्ध धम्माचा प्रचार-प्रसार तसेच धम्म शिक्षण वर्ग चालविणाऱ्या बौद्धाचार्यांचा सत्कार करण्यात आला. पुणे शहरातील दानशूर व्यक्तिमत्त्व तसेच वनवर्धिनी फाउंडेशन चे अध्यक्ष धम्मबंधू विजय ढोणे, अंकिता ढोणे, रमेशजी ढोणे आणि संगीता ढोणे परिवाराच्या वतीने पांढरे शुभ्र वस्त्र व भोजनदान देऊन दान पारमिता पूर्ण करण्यात आली.

तसेच शिबिराच्या पाच दिवसांत बोपोडी परिसरातील रमाकांत मंडळ, सिद्धार्थ संघ महिला संघ, भीमज्योत मंडळ, बुद्धभूषण समाज मंडळ, कोरके अँड कंपनी तसेच मराठवाडा बौद्ध परिषद यांच्या वतीने नाश्ता, दुपारचा फलोहार आणि रात्रीचे भोजन देण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश सूर्यवंशी यांनी केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button