May 10, 2026

रे निओ फार्माचा पुण्यात शुभारंभ, महाराष्ट्रात दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्‍ध करून देण्यावर अधिक भर


पुणे, ८ मे २०२६: रे निओ फार्मा या नेक्‍स्‍ट-जनरेशन फार्मास्‍युटिकल कंपनीने पुण्यात आपल्या कामकाजाचा अधिकृत शुभारंभ केला आहे, ज्‍यासह महाराष्ट्रात दर्जेदार आणि परवडणारी आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या प्रवासामध्‍ये आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पुण्यातील एका पत्रकार परिषदेत या घोषणेसोबत कंपनीच्या नेतृत्‍व टीमने आपली दूरदृष्टी, विकास आराखडा आणि रुग्ण-केंद्रित आरोग्यसेवा वितरणाबद्दलची कटिबद्धता स्पष्ट केली.
आपल्या महाराष्ट्राप्रती धोरणामध्‍ये पुण्याला केंद्रस्थानी ठेवून रे निओ फार्माचा शहरातील आघाडीचे हॉस्पिटल्‍स, वैद्यकीय व्यावसायिक आणि संशोधन संस्थांच्या प्रबळ परिसंस्थेचा लाभ घेण्याचा मनसुबा आहे. भारतातील सर्वात प्रगतीशील आरोग्य आणि शिक्षण केंद्रांपैकी एक म्हणून ओळखले जाणारे पुणे शहर कंपनीला सखोल भागीदारी निर्माण करण्यासाठी आणि राज्यातील शहरी व अर्ध-शहरी बाजारपेठांमध्ये आपला विस्तार करण्यासाठी प्रबळ पाया उपलब्ध करून देते.
रे निओ फार्मा अॅक्युट (तात्काळ उपचार लागणारे आजार) आणि क्रॉनिक (दीर्घकालीन आजार) उपचारांशी संबंधित ९० पेक्षा जास्त फॉर्म्युलेशनचा (औषध रचना) पोर्टफोलिओ सादर करत आहे, तसेच प्रगत उपचारांच्या अनेक उत्पादनांवर सध्या काम सुरू आहे. महाराष्ट्रात, कंपनी आपले वितरण जाळे सक्रियपणे प्रबळ करत आहे. डॉक्टर, आरोग्यसेवा प्रदाता आणि चॅनेल पार्टनर्ससोबत धोरणात्मक सहयोग प्रस्थापित करत आहे, ज्‍यामुळे रुग्णांना शेवटच्या टप्प्यापर्यंत औषधे उपलब्ध होतील आणि आरोग्यासाठी उत्तम परिणाम मिळतील.
उद्योजक अमित पटनी यांनी स्थापन केलेली रे निओ फार्मा तंत्रज्ञान, उत्पादन, आरोग्यसेवा पायाभूत सुविधा आणि फायनान्‍स यांसारख्या विविध क्षेत्रांतील उत्कृष्ट व्यवसायाचा वारसा एकत्र आणते. हे बहुक्षेत्रीय नैपुण्य कंपनीला आधुनिक, चपळ आणि नैतिक मूल्यांवर आधारित औषध निर्माण व्यवसाय उभारण्यासाठी प्रबळ आधार देते.
कंपनीचा पोर्टफोलिओ उपचारांच्या विस्तृत क्षेत्रांच्‍या गरजांची पूर्तता करतो, ज्यामध्ये अँटीबायोटिक्स, मधुमेह विरोधी काळजी, पचनसंस्थेशी संबंधित उपचार, वेदना व ऑर्थोपेडिक व्यवस्थापन, श्वसन व एलर्जीसंबंधित काळजी, हृदयविकार उपचार आणि डर्माटोलॉजी यांचा समावेश आहे. उच्‍च-दर्जाच्या ब्रँडेड जेनेरिक्सवर लक्ष केंद्रित करून रे निओ फार्मा रुग्णांच्या बदलत्या गरजांनुसार सुरक्षित, प्रभावी आणि सुलभ उपचार उपाय प्रदान करण्यासाठी कटिबद्ध आहे.
“पुणे आमच्यासाठी धोरणात्मक आणि अर्थपूर्ण आद्य बिंदू आहे. या शहरातील प्रगत आरोग्यसेवा परिसंस्था आणि येथील वैद्यकीय व्यावसायिक व संस्थांचे मजबूत जाळे दीर्घकालीन प्रभाव निर्माण करण्यासाठी या शहराला आदर्श बाजारपेठ बनवते. रे निओ फार्मामध्ये आम्ही आरोग्यसेवेकडे समाजाप्रती असलेली जबाबदारी म्हणून पाहतो. आम्‍ही महाराष्ट्रात भागधारकांसोबत मिळून काम करण्यावर लक्ष केंद्रित कले आहे, ज्‍यामुळे औषधे अधिक प्रमाणात उपलब्‍ध होतील, विश्वास अधिक दृढ होईल आणि रुग्णांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारी दर्जेदार औषधे आम्ही पोहोचवू शकू,” असे रे निओ फार्माचे संस्थापक अमित पटनी म्‍हणाले.
महाराष्ट्राव्‍यतिरिक्त रे निओ फार्माची उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आणि दिल्ली-एनसीआर यांसारख्या प्रमुख बाजारपेठांमध्येही उपस्थिती वाढत आहे, ज्याद्वारे कंपनी भारतातील अधिकाधिक व्‍यक्तींपर्यंत पोहोचत आहे. असे असले तरी, कंपनीचे तात्काळ लक्ष महाराष्ट्रातील आपला सहभाग अधिक सखोल करण्यावर आहे, जेथे प्रादेशिक वाढीला गती देण्यासाठी पुणे शहराची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे.
अंगभूत क्षमता आणि धोरणात्मक उत्पादन भागीदारी यांचे संयोजन असणाऱ्या स्थिर कार्यप्रणालीसह रे निओ फार्मा गुणवत्ता आणि नियमांचे उच्‍च निकष राखून कार्यक्षमतेने विस्तार करण्यास सज्ज आहे. संशोधन, सुशासन आणि रुग्ण-प्रथम या तत्त्वांवर दिलेला प्रबळ भर पाहता ही कंपनी संपूर्ण क्षेत्रातील आरोग्यसेवा प्रदात्यांसाठी विश्वसनीय भागीदार म्हणून उदयास येण्यास सज्ज आहे.


पुण्यापासून आपल्या प्रवासाची सुरुवात करताना रे निओ फार्माचा महाराष्ट्रातील आरोग्यसेवा क्षेत्रात मोलाचे योगदान देण्याचा मनसुबा आहे. औषधांची उपलब्धता अधिक सहजसाध्य करणे, उपचारांचे उत्तम परिणाम मिळवून देणे आणि दीर्घकालीन व शाश्वत वाढीसाठी प्रबळ पाया रचणे यावर कंपनीचा भर आहे.


About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button