पि. एस. मोतेवाड यांचा वाढदिवस मुंबईत जल्लोषात साजरा; मंत्री, नेते व समाजबांधवांची उत्स्फूर्त उपस्थिती
मुंबई, दि. 23 मार्च 2026 (सोमवार) — भारतीय नवनिर्माण लहुजी सेना सलग्न “भारतीय नवनिर्माण लहुजी युवा सेना” चे संस्थापक अध्यक्ष तसेच “संग्राम बहुउद्देशीय सामाजिक संस्था (S.B.S.S.)” चे संस्थापक अध्यक्ष, समाजसेवक पि. एस. मोतेवाड यांचा वाढदिवस मुंबईत विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कुलाबा, कफपरेड, मंत्रालय आणि अंधेरी पूर्व येथे समाजबांधव व मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून मोतेवाड यांना केक भरवून शुभेच्छा दिल्या. तसेच वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंत्रालयात शुभेच्छापत्र देऊन अभिनंदन केले.
याशिवाय उपमुख्यमंत्री कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी सुभाष पालव, आमदार शाहाजी बापू पाटील यांसह अनेक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून किंवा संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या.

22 मार्चच्या मध्यरात्री कुलाबा, कफपरेड परिसरातही समाजबांधवांनी मोठ्या जल्लोषात वाढदिवस साजरा केला. यावेळी विविध समाजांचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मातंग समाजाचे नेते भिमा तोगरे, महेंद्र कांबळे, सुरेंद्र कांबळे, धनाजी सूर्यवंशी, अनिल सूर्यवंशी, रविराज गुंडीने, चंदू घोडके, कमलाकर राठोड यांसह अनेकांनी सहभाग नोंदवला.

तसेच अंधेरी पूर्व येथे ॲड. राजकुमार मोहिते, ॲड. बबनराव सूर्यवंशी व त्यांच्या सहकाऱ्यांनीही केक कापून वाढदिवस साजरा केला.

या निमित्ताने मातंग समाजासह विविध समाजघटकांतील नागरिकांनी व राजकीय नेत्यांनी मोतेवाड यांना शुभेच्छांचा वर्षाव केला. सर्वांच्या शुभेच्छांबद्दल पि. एस. मोतेवाड यांनी आभार व्यक्त केले.

